काम वाटप समितीची बैठक बेरोजगार सेवा सोसायट्यांकडून प्रस्ताव मागविले


            अकोला, दि. 11 (जिमाका):  शासकीय औद्यगीक प्रशिक्षण संस्था अकोला येथील साफ- सफाईची ठेका पद्धतीने 3 रिक्त पदावर कर्मचारी  भरावयाचे आहेत. यासाठी  काम वाटप  समिती तथा मुख्य  कार्यकारी  अधिकारी जिल्हा परिषद यांचे  अध्यक्षते खाली  गुरूवार (दि. 13)  रोजी  काम वाटप समितीची  बैठक जिल्हा परिषद येथे मुख्य कार्यकारी अधिकारी   यांच्या दालनात आली आहे. अशी माहिती  सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार  व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी  दिली आहे.
            इच्छुक संस्थानी आपले प्रस्ताव प्राथमिक छाननी करिता  गुरूवार (दि. 13)  पर्यंत  सहाय्यक आयुक्त , जिल्हा कौशल्य विकास, रोजगार  व उद्योजकता मार्गदर्शन  केंद्र , प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर येथे सादर  करावा त्यानंतर प्राप्त  होणा-या  प्रस्तावाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी, काम वाटपाचा अंतिम निर्णय  समितीचा राहील. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार  व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांचेशी  संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज