महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सत्यापनासाठी येणा-या शेतक-यांना सन्मानपुर्वक वागणूक द्या; जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर





 अकोला,दि.18(जिमाका)- महात्मा जोतीराव फुले शेतकरी  कर्जमुक्ती योजनेच्या  सत्यापनाच्या कामासाठी येणा-या शेतक-यांना सन्मानाची वागणूक देऊन काम करा,  असे निर्देश  जिल्हाधिकारी जितेंद्र  पापळकर यांनी सामान्य सुविधा केंद्र (सीएससी) संचालकांना  दिलेत.
शासनामार्फत राबविण्यात येणा-या महात्मा जोतीराव फुले  शेतकरी  कर्जमाफी  योजनेंतर्गंत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या  जिल्ह्यातील शेतक-यांच्या गावनिहाय याद्या 21 फेब्रूवारी रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यानंतर संबंधीत शेतक-यांचे बँक खाते क्रमांक व आधार क्रमांकांची पडताळणी सामान्य सुविधा केंद्रांमध्ये (सीएससी) करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने सोमवार (दि.17) रोजी जिल्हाधिका-यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या  नियोजन भवनात कॉमन सर्व्हिस सेंटर, आपले सरकार सुविधा केंद्र , महाऑनलाईनच्या  संचालकांची बैठक घेतली.
 कर्जमुक्ती योजनेच्या आधारकार्डानुसार लाभार्थ्याचे  सत्यापन व प्रमाणिकरणाचा कार्यक्रम विशेष मोहिमेतंर्गत 22 ते 28 फेब्रूवारी पर्यंत गावोगावी  राबविण्यात येणार आहे याची  अंमलबजावणीत पडताळणीच्या  कामासाठी कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये येणा-या शेतक-यांना सन्मानाची वागणूक देण्यात येऊन त्यांना  योग्य सहकार्य करण्यात यावेत, समाधानकारक  काम न केल्यास संबंधीत ‘सीएससी’ संचालकांविरूद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी या बैठकीत दिला.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, अकोल्याचे  तहसीलदार विजय लोखंडे , तालुका कृषी अधिकारी  शलाका सरोदे, सीएससी सेंटरचे संजय यादव यांच्यासह अकोला तालुक्यातील कॉमन सर्व्हिस सेंटर, आपले सरकार सुविधा केंद्र , महाऑनलाईनचे संचालक उपस्थित होते.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज