अर्थ व सांख्यिकी संचालनालय राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयादवारे माहीती गोळा करण्यास सहकार्य करा


अकोला, दि. 7 (जिमाका): केंद्र शासनाच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंबलबजावणी मंत्रालयाच्या (Ministry of Statistical & Prodramme Implementation) अंतर्गत राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (National
Statistical Officer) दवारे दरवर्षी संपुर्ण देशात व केंद्रशासनाच्या व राज्यशासनाच्या राष्ट्रीय नमुना
पाहणीच्या विविध विषयावर नियोजनात्मक माहीती व आकडेवारीचे संकलन करण्याचे काम केले जाते. या
अनुषंगाने (जानेवारी-2020 ते डिसेंबर-2020) या कालावधीत राष्ट्रीय नमुना पाहणी 78 वी फेरी अंतर्गत
देशातील पर्यटनावरिल खर्च व बहुविध निर्देशांक पाहणी या बाबत तपशिलवार माहीती गोळा करण्यात
येणार आहे. या पाहणीत आढळणा-या निष्कर्षाचा उपयोग पर्यटनाचे देशातील आर्थीक स्थितीमधील महत्व
व पर्यटनाशी निगडीत विविध क्षेत्रातील रोजगार निर्मीती, मागासवर्गीयांचा विकास या सारख्या विविध
विषयाकरिता, तसेच United Nation ने ठरवून दिलेल्या शाश्वत विकास ध्येये-2030 च्या अनुषंगाने
देशस्तरावरिल काही महत्वाचे निर्देशांक काढण्यासाठी याचा वापर करण्यात येणार आहे.
अकोला विभागातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते कि, महाराष्ट्र शासनाच्या
अर्थ व सांख्यिकी संचालनालय, नियोजन विभागांतर्गत असलेल्या जिल्हा सांख्यिकी कार्यालयामधील
अधिकारी/कर्मचारी यांना माहीती गोळा करण्यास आपण सहकार्य करुन आवश्यक ती माहीती देण्यात
यावी.                                                                               00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम