पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चु कडू यांचा जिल्हा दौरा


अकोला,दि. 18 (जिमाका)- राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास , शालेय शिक्षण,  महिला व बालविकास  इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती,  भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण,  कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.  ओमप्रकाश उर्फ  बच्चू कडु  हे  गुरूवार दि. 20 रोजी जिल्हा दौ-यावर  येत आहेत. त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम  याप्रमाणे.
गुरूवार दि. 20 रोजी  दुपारी 12 वाजता अकोला इंडीस्ट्रीयल असोशिएशन सभागृह, एमआयडीसी, अप्पू पाँईट येथे  अकोला जिल्ह्यातील औद्योगीक  परिसरातील विकास कामात येणा-या अडचणीबाबत  आढावा बैठकीस उपस्थिती . दुपारी 2 वाजता  होटल  रायझिंगसन येथे महाराष्ट्र साप्ताहिक  ग्रामीण पत्रकार परिषद यांनी  आयोजीत केलेल्या विभागीय मेळाव्यास उपस्थिती . दुपारी 3 वाजता  विदर्भ चेंबरर्स  ऑफ कॉमर्स  ॲन्ड इंडस्ट्रीज,   श्रावगी टॉवर्स येथे आयोजीत कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 4 वाजता नियोजन भवन  जिल्हाधिकारी कार्यालय येथे  आयोजीत  मायक्रो फायनांस/ हुंडी चिठ्ठी बाबत आढावा बैठक ,  जलसंपदा व सिंचन विभागाची आढावा बैठक,  सिंचन प्रकल्प बाधीत कुंटूंबांचे पुनर्वसनबाबत  आढावा बैठक, विट भट्टी वरील मजुराच्या शिक्षणाबाबत आढावा बैठकीस  उपस्थिती.  सायं 6 वाजता  स्थानिक विविध पक्षाचे अध्यक्ष/पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा. सवडीने  मुर्तिजापूर मार्गे  अमरावतीकडे प्रयाण.
                                                             00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज