महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना :जनजागृतीसाठी प्रचार रथ रवाना


             अकोला,दि.१३(जिमाका)- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जिल्ह्यात राबविण्यात येत असून येत्या शुक्रवार दि. २१ पासून पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या नावांच्या याद्या गावपातळीवर पहावयास उपलब्ध होणार आहेत. त्यानंतर शेतकऱ्यांनी आपले तपशिल पडताळून पहावयाचे आहेत. याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी  प्रचार रथास आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी  हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. जिल्ह्यात या प्रचार रथा सोबतच सोशल मिडीया, आकाशवाणी  अशा माध्यमांचा
वापर करुन शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.
            आज सकाळी जिल्हाधिकारी पापळकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून अकोला जिल्हा मध्यवर्ती बॅंकेमार्फत तयार करण्यात आलेल्या प्रचार रथास हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. यावेळी त्यांचे समवेत निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे,  जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. प्रवीण लोखंडे, जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक आलोक तारेनिया,  अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे  सहाय्यक व्यवस्थापक गजानन पाटील  आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज