औद्योगिक श्रेत्राच्या विकासासाठी शासन कटिबद्ध -पालकमंत्री ना. बच्चू कडू




अकोला,दि. 3 (जिमाका)-  औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, महिला व बालविकास,  इतर मागासवर्ग,सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग,विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, महिला व बालविकास,शालेय शिक्षण व कामगार कल्याण राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश  उर्फ बच्चू कडू यांनी केले.
एम.आय.डि.सी. येथे अकोला इंडस्ट्रीज असोशिएशनतर्फे पालकमंत्री बच्चू कडू यांच्या उपस्थितीत चर्चा सत्राचे (रविवार दि.2) रोजी आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करतांन  ते बोलत होते. यावेळी  अकोला इंडस्ट्रीज असोशिएशनचे अध्यक्ष  उन्मेश मालु, उपाध्यक्ष मनोज खंडेलवाल, सचिव नितीन बियाणी, सहसचिव नरेश बियाणी, राजीव बजाज, निखील अग्रवाल, विदर्भ चेम्बर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजकुमार ‍बिलाला यांची प्रमुख  उपस्थिती होती.
यावेळी औद्योगीक क्षेत्रातील समस्या पालकमंत्री ना. कडू यांनी जाणून घेतल्या. यामध्ये अकोला येथे अतिरिक्त  एम.आय.डि.सी. प्रादेशिक कार्यालय, कायम स्वरूपी पाणी पुरवठा एम.आय.डि.सी. पोलीस स्टेशनचे हद्दवाढ, विमानतळ विस्तारीकरण , एम.आय.डि.सी. मधील 100 मीटर रस्त्याचे क्राँक्रीटीकरण आदी समस्यावर विचार विनिमय करण्यात आला. औद्योगीक श्रेत्रातील समस्याचे निराकरण करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येईल.  अशी ग्वाही  दिली.
यावेळी विदर्भ चेम्बर ऑफ कॉमर्स,  आईल मिल  असोशिएशनचे, टेन्ट  असोशिएशन,  अकोला इंडस्ट्रीज असोशिएशन, अकोट इंडस्ट्रीज असोशिएशन,  सोप इंडस्ट्रीज असोशिएशन चा  पदाधिका-यासह कार्यकारणीचे सदस्य उपस्थित होते.
                                                         00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज