लहान मत्स्य व्यावसायिकांना मत्स्य जाळे पुरवठा; अर्ज मागविले


अकोला,दि.१३ (जिमाका):  प्रकल्प अधिकारी , एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अकोला यांचे कायक्षेत्रा अंतर्गत विशेष केंद्रीय सहाय्य योजनेत आदिवासी मत्स्य संस्थांना मत्स्य जाळे पुरवठा करणे ही  योजना मंजुर असुन या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
वैयक्तिक स्वरूपात छोट्या  नद्या, नाले ,तलावात  मासेमारी करणाऱ्या तसेच मत्स्य संस्थेचे सभासद असणाऱ्या लाभार्थ्यांकडुन अर्ज मागविण्यात आले आहेत.   त्यासाठी  दि. १७ फेब्रूवारी ते ११ मार्च   या कालावधीत अर्ज पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 आवश्यक कागदपत्रे -  आधारकार्ड, जातीचा दाखला, रहिवाशी दाखला, वैयक्तीक स्वरूपात छोट्या नद्या, नाले ,तलावात  मासेमारी करून आपली जिवीका चालवित असल्याबाबत ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र, मत्स्य संस्थेचे सभासद असल्याबाबत संस्थेचे पत्र,  पासपोर्ट साईज फोटो.
या दस्ताऐवजांसह  दि. १७ फेब्रूवारी ते ११  मार्च   या कालावधीत इच्छुक लाभार्थ्यांनी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी स्वत:  उपस्थित राहुन  कार्यालयात अर्ज द्यावा. जेष्ठतेनुसार व  जिल्हानिहाय लक्षांकानुसार लाभार्थी निवड करण्यात येणार असुन मत्स्य संस्थेचे सभासद असणाऱ्या  लाभार्थ्यांची निवड प्राधान्याने करण्यात येणार असल्याचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अकोला यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज