क्रीडांगण विकास अनुदान योजना सोमवार दि. 17 पर्यंत प्रस्ताव आमंत्रीत



अकोला,दि. 4 (जिमाका)-जिल्हयात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार व जोपासना करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचेअनुषंगाने तसेच ग्रामीण /शहरी भागात खेळविषयक सूविधा निर्माण करण्याकरीता, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयअकोला मार्फत, क्रीडांगण विकास अनुदान योजना राबविण्याकरीता आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या इच्छुक संस्थांनी विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घेवुन सोमवार दि 17 पर्यंत आवश्यक कागदपत्रासह पारिपूर्ण प्रस्ताव दोन प्रतीत या कार्यालयास कार्यालयीन वेळेत सादर करावेअसे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.
या योजनेंतर्गत क्रीडांगण समपातळीत करणे,200/400 मीटरचा धवनपथ तयार करणे,क्रीडांगणास भिंतीचे/तारेचे कुंपण घालणे, विविध खेळांची एक किंवा अनेक प्रमाणित क्रीडांगणे तयार करणे, प्रसाधनगृह/चेंजिंगरूम बांधणे, पिण्याच्या व मैदानावर मारण्यासाठी आवश्यक पाण्याची सुविधा निर्माण करणे, क्रीडासाहीत्य ठेवण्यासाठी भांडारगृह बांधणे, क्रींडागणांवर फ्लड लाईटची सुविधा निर्माण करणे, क्रीडा साहित्य खरेदी करणे,क्रीडांगणावर मातीचा/सिमेंटचा भराव असलेली प्रेक्षक गॅलरी/आसन व्यवस्था तयार करणे, प्रेक्षक गॅलरीवर / आसनव्यवस्थेवर शेड तयार करणे. क्रीडांगणाभोवती डेनेज व्यवस्था करणे, निर्मित सुविधा विचारात घेवुन मैदानावर पाणी मारण्यासाठी स्प्रिंकलर यंत्रणा बसविणे व मैदानावर रोलींग करण्यासाठी हॅन्ड मिनी लोअर खरेदी करणे ईत्यादी बाबींकरीताअनुदान मंजूर करण्यात येते.
अनुदानासाठी पात्र संस्थांसाठी प्राधान्यक्रम असा राहील, स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत, नगरपरिषदनगरपंचायत, महानगरपालीका, जिल्हा परिषद, कंन्टोनमेंट बोर्ड, शासकीय रुग्णालय, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,पोलीस कल्याण निधी/पोलीस विभाग, शासकीय कार्यालये तसेच जिल्हा परिषद, आदिवासी विकास व सामाजिक न्यायविभाग, अल्पसंख्यांक विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या सर्व शासकीय प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिकशाळा/आश्रमशाळा व वसतीगृह, तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभाग व उच्च शिक्षण विभाग यांनी मान्यता दिलेल्या व शासनामार्फत अनुदान मिळण्यास प्रारंभ होवून 5 वर्ष पुर्ण झालेले शाळा, व महाविद्यालये अनुदानासाठी पात्र राहतील.
00000

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज