व्यायामशाळा विकास अनुदान योजना सोमवार दि. 17 पर्यंत प्रस्ताव आमंत्रीत



                     अकोला,दि. 4 (जिमाका)-  जिल्हयात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार व जोपासना करण्यासाठी पोषक वातावरण निर्माणकरण्याचे अनुषंगाने तसेच ग्रामीण /शहरी भागात खेळविषयक सूविधा निर्माण करण्याकरीता, जिल्हा क्रीडाअधिकारी कार्यालय अकोला मार्फत, व्यायामशाळा विकास अनुदान योजना राबविण्याकरीता आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव दिनांक 17 पर्यंत दोन प्रतीत या कार्यालयास कार्यालयीन वेळेत मागविण्यात येत आहेत.
                     या योजनेंतर्गत व्यायामशाळा बांधकाम करणे, व्यायाम साहीत्य खरेदी करणे तसेच खुलीव्यायामशाळा (ओपन जिम) या तीन बाबींकरीता, प्रतीबाब रूपये 7.00 लक्ष अनुदान मंजूर करण्यात येते.एकावेळेस एकाच बाबीकरीता प्रस्ताव अपेक्षित आहे. अनुदानासाठी पात्र संस्थांसाठी प्राथम्यक्रम असा राहील,स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत, नगरपरिषद, महानगरपालीका, जिल्हा परिषद, आदिवासी विकास व सामाजिक न्याय विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या सर्व शासकीय पूर्वप्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिकशाळा/आश्रमशाळा व वसतीगृह, क्रीडा विभागाच्या विविध समित्या, तसेच पोलीस कल्याण निधी/पोलीस विभाग,शासकीय स्पोर्टस् क्लब, तसेच शासकीय महाविद्यालये, याचप्रमाणे खाजगी शैक्षणिक, संस्थेद्वारे चालविण्यातयेणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक शाळा क. महाविद्यालये ज्यांना शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे व ज्यांना शासनामार्फत अनुदानाचा प्रथम टप्पा मंजूर होवून, पाच आर्थिक वर्ष पूर्ण झाले आहेत. अशा संस्था आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या इच्छुक व उपरोक्तपणे नमुद संस्थांनी विहित नमुन्यातील अर्ज दि. 17 पर्यंत या कार्यालयातून, कार्यालयीन वेळेत प्राप्त करून घ्यावे. जागेचे खरेदी/दानपत्रा/नोंदणीकृत कागदपत्र,बँक बॅलन्स, करावयाच्या कामाचे (संबंधित शासकीय अभियंता यांचे द्वारा) अंदाजपत्रक, नोंदणी प्रमाणपत्र, गतवर्षाचे लेखाविवरण, तसेच शासन निर्णयानूसार आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव दि. 17 पर्यंत दोन प्रतीत या कार्यालयास कार्यालयीन वेळेत सादर करावे. सदरचे प्रस्ताव विहित मुदतीत व परिपूर्ण या कार्यालयात सादर करणे बंधनकारक आहे.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज