पालकमंत्र्यांनी घेतला सिंचन प्रकल्पांचा आढावा


अकोला,दि.२०(जिमाका)- जिल्ह्यातील विविध सिंचन प्रकल्प व त्या अनुषंगाने झालेल्या तक्रारींचा आढावा आज राज्याचे  जलसंपदा व लाभक्षेत्र विकास , शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू  यांनी आज घेतला.
या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार,  निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे,   तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी ना. कडू यांनी  पूर्णा बॅरेज-२ ( नेरधामणा ) मध्यम प्रकल्प  ता. तेल्हारा,  उमा बॅरेज मध्यम प्रकल्प ता. मुर्तिजापूर, घुंगशी बॅरेज मध्यम प्रकल्प, ता. मूर्तिजापूर, काटेपूर्णा बॅरेज प्रकल्प,  कवठा बॅरेज प्रकल्प, ता. बाळापूर,  शहापूर बृहत लघु प्रकल्प ता. अकोट,  कारंजा रमजानपुर लघु प्रकल्प,  पोपटखेडा टप्पा २ प्रकल्प,  शहापूर लघु प्रक्ल्प,  वाई संग्राहक  लघु प्रक्ल्प,  काटीपाटी बॅरेज लघु प्रकल्प आदी अपूर्ण तसेच सुरु न झालेल्या  प्रकल्पांची माहिती घेतली. या अपूर्ण  प्रकल्पांपैकी लवकर पूर्ण होऊ शकणाऱ्या प्रकलपांबाबत वरिष्ठ पातळीवर बैठकीचे नियोजन करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. अकोला शहरासाठी जिगांव धरणातून पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जलसंपदा विभागास दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज