प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना पीक कर्ज उपलद्धतेसाठी विशेष मोहिम



अकोला,दि.12(जिमाका):  शेतक-यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN ) योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत प्रती शेतकरी कुटुंबाला प्रती वर्ष 6000/- इतके आर्थिक सहाय्य 3 टप्प्यांमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. जिल्ह्यात योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत अकोला जिल्ह्यातील एक लक्ष 95 हजार 470 शेतक-यांची नोंदणी पी.एम. किसान पोर्टलवर करण्यात आली आहे. वेगवेगळया वित्तीय संस्था, बँकाकडून यापैकी एक लाख 72 हजार  157  लाभार्थी शेतक-यांना पिक कर्ज पुरवठा करण्यात आला आहे. उर्वरित लाभार्थी शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी अकोला यांनी यंत्रणांना दिलेआहेत. पीएम किसान योजनेअंतर्गत लाभार्थी शेतक-यांनी अद्याप कोणत्याही वित्तीय संस्था व बँकाकडून पिक कर्ज घेतलेले नाही, अशा शेतक-यांनी या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहनजिल्हाधिकारी अकोला यांनी केले आहे. या शेतक-यांना बँकिंग क्षेत्रापासून पिककर्ज उपलब्ध करुनदेण्यासाठी विशेष मोहिम राबविण्याच्या सूचना केंद्र सरकारकडून प्राप्त झाल्या आहेत.

या शेतक-यांना सुटसुटितरित्या अर्ज करता यावा यासाठी आयबीए संस्थेकडून एक पानीअर्जाचा नमुना सर्व बँकांना उपलब्ध करुन देण्यात आला आहे. लाभार्थी शेतक-यांनी या अर्जासोबतशेतीचे उतारे व कर्ज नसलेबाबतचे घोषण पत्र घेऊन ज्या बँकेतून पीएम किसान योजनेचा लाभघेतला आहे, तेथे संपर्क साधावा. कोणत्याही बॅक अथवा वित्तीय संस्था येथे पिककर्ज नसणा-यापीएम किसान लाभार्थी शेतक-यांना कर्ज प्रोसेसिंग चार्जेस व निरीक्षण खर्च हा बँकाकडून माफकरण्यात येणार आहे. परिपूर्ण अर्ज आवश्यक कागदपत्रांसह प्राप्त झाल्यापासून 15 दिवसामध्ये
शेतक-यांना बँका मार्फत किसान क्रेडीट कार्ड (केसीसी) योजनेअंतर्गत पिक कर्ज उपलद्ध करुनदेण्यात येणार आहे. सर्व तलाठी, ग्रामसेवक व कृषीसहायक यांनी गावपावतळीवर यासाठी विशेषमोहिम राबवून आपल्या कार्यक्षेत्रातील बँकांना सर्वतोपरी सहकार्य करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी  जितेंद्र  पापळकर  यांनी  दिले  आहेत.
00000


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज