अमरावती विभागातील कृषी अधिका-यांची आढावा बैठक शेतकऱ्यांच्या समस्या व अडचणी सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध कृषीमंत्री ना. दादाजी भुसे









अकोला, दि. 5 (जिमाका):  शेतकऱ्यांच्या समस्या व अडचणी सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री ना. दादाजी भुसे यांनी केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कमिटी हॉलमध्ये अमरावती विभागातील कृषी अधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार नितीन कुमार देशमुख आमदार गोपीकिशन बाजोरिया विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचे प्रकल्प संचालक गणेश पाटील , डॉ. पंजाबराव देशमुख जैविक मिशनचे कृषी उपसंचालक आरिफ शहा ,प्रगतिशील शेतकरी गणेश जगन्नाथ काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या विविध योजनांसाठी वारंवार कागदपत्रांची मागणी करू नये एकदाच आवश्यक त्या कागदपत्राची मागणी करावी असे निर्देश कृषिमंत्री ना. दादाजी भुसे यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिले.  शेतकऱ्यांशी हितगुज साधण्यासाठी कृषी विभागातील कृषी सेवक सह अधिकाऱ्यांनी किमान तीन दिवस गावात जावे त्यामुळे आपल्याकडे आलेल्या कृषी ज्ञानात उपयोग शेतकऱ्यांना होईल असे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.
येत्या दोन महिन्यात शेतकरी मोबाईल किंवा नदीच्या आपले सेवा केंद्रावर जाऊन विविध योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतील अशी व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिली. शेतकऱ्यांच्या योजनांची माहिती व्हावी तसेच त्यांच्या अडीअडचणी व समस्याच्या निराकरण व्हावे, यासाठी तालुक्या पातळीवर शेतकरी सन्मान कक्ष स्थापन करायचे निर्देश कृषिमंत्री यांनी दिले.
पाण्याचा प्रत्येक थेंबाचा वापर कसा करता येईल यासाठी नियोजन करावे असे सांगून कृषीमंत्री पुढे म्हणाले की ,शेततळ्यांना अस्तरीकरण करण्याची योजना हाती घेण्यात येणार आहे. शेतक-यांच्या शेतातील मातीचे  माती परीक्षण करून त्याची माहिती सर्वे नंबर प्रमाणे तालुका पातळीवर उपलब्ध व्हावी, जेणेकरून शेतकऱ्यांना कोणती पिके घ्यावी, कोणते खाते टाकावे याबाबत नियोजन करता येऊन कृषी अधिका-यांना शेतक-यांना योग्य मार्गदर्शन करता येईल. उत्पन्न वाढीसोबत अन्नधान्यांची साठवण त्याच्यावरील प्रक्रिया याबाबत नियोजन करणे आवश्यक असल्याचे कृषी मंत्री यांनी सांगितले. गट शेती, शेती उत्पादक कंपनी, महिला बचत गटाव्दारे टॅक्ट्रर तसेच शेती अवजारे आदी बाबींचाही विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
 यावेळी विभाग विभागीय सहसंचालक सुभाष नागरे यांनी विभागातील शेतीबाबत माहिती दिली.             डॉ. पंजाबराव देशमुख जैविक मिशनचे कृषी उपसंचालक आरिफ शहा यांनी जैविक कृषी मिशन बाबत माहिती दिली.  यावेळी  कृषी विभागाच्या वतीने प्रकाशीत करण्यात आलेल्या विविध पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. या आढावा बैठकीला अकोल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ,  अमरावतीचे विजय चवाळे,  वाशिमचे श्री तोटावार बुलडाणाचे  श्री नाईक  यवतमाळचे श्री कोडपकरसह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
00000


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज