पारधी समाज युवक युवतींना पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण;अर्ज मागविले


अकोला,दि. 24 (जिमाका)- प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास  प्रकल्प , अकोला यांच्या कार्यक्षेत्रातील अकोला जिल्ह्यातील जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना सन 2019-20  या वर्षात मंजुर निधीतून  पारधी समाजाच्या विकासासाठी योजना राबविण्यात येत असून त्याअंतर्गत पारधी समाजाच्या युवक युवतींना पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यासाठी इच्छूक लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पारधी समाजाच्या विकासासाठी असलेल्या विविध योजनामध्ये पारधी/फासेपारधी समाजाच्या जमाती कडून दि. 27 फेब्रूवारी ते दि. 6 मार्च या कालावधीत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी हे अर्ज मागविण्यात आले आहेतया पारधी समाजातील युवक/युवतींना पोलीस भरती  पुर्व  प्रशिक्षण देणे , लाभार्थी संख्या- 40 (इयत्ता 12 वी पास असलेले विद्यार्थ्यासाठी) योजना समावेश असलेली माहिती  प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवास विकास प्रकल्‍प अकोला यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज