पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार भरती मेळावा ,278 उमेदवारांची प्राथमिक निवड


अकोला, दि. 7 (जिमाका): मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र व्दारा औद्योगिक प्रशिक्षण
संस्था तसेच जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता  मार्गदर्शन केंद्र यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 05  रोजी सकाळी 10 वाजेपासुन शासकीय, रतनलाल प्लॉट, अकोला येथे पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार भरती मेळावा संपन्न झाला.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी पि. एन. जयस्वाल, प्रमुख पाहणे म्हणुन जिल्हाकौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र चे सहा. आयुक्त सुधाकर झळके, औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य  एम. बी. बंडगर, उपप्राचार्य एस. पी. झोडपे  तसेच विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
 रोजगार मेळावा यशस्वी होण्याचे दृष्टीने जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अकोला येथील सर्व कर्मचारी वृंदांनी अथक परिश्रम घेतले. यामध्ये रोजगार व स्वयंरोजगार विषयक मार्गदर्शन अशोक लोहीया यांनी मार्गदर्शन केले. रोजगार मेळाव्यास मे. सुझुकी मोटर्स, गुजरात प्रा.लि., इनोट्रो मल्टीसर्व्हिसेस, अकोला, मॉडर्न फोर्स सेक्युरिटी प्रा. लि. हैद्राबाद, लिबेन लाईफ सायन्स, लि. अकोला, साईश्रध्दा इन्टरप्रायजेस, प्रा. लि. पुणे, युरेका फोर्ब्स प्रा. लि. अकोला,नवभारत फर्टीलायझर्स प्रा. लि. औरंगाबाद, नवकिसान बॉयो प्लॅन्टेक, प्रा. लि. जळगांव या कंपन्यांचे प्रतिनिधी यांनी मुलाखती घेतल्या. त्यामध्ये एकुण 305 उमेदवार उपस्थित होते. त्यापैकी 278 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आलेली आहे असे सहा. आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला यांनी कळविले आहे.
                                              000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज