सातव्या आर्थ‍िक गणनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करा -जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर




            अकोला,दि.18(जिमाका)-  जिल्ह्यात  सातव्या आर्थ‍िक गणनेच्या कामाला  सुरूवात झाली आहे.  प्रभावीपणे जनजागृतीकरून  अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले. जिल्हाधिकारी यांच्या दालनात   सातव्या आर्थ‍िक गणनेची  अंमलबजावणी करण्याकरीता स्थापन करण्यात  आलेल्या जिल्हास्तरीय समन्वय समितीची सभा  आयोजीत करण्यात  आली होती. 
            या सभेला  निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे ,  जिल्हा नियोजन अधिकारी  ज्ञानेश्वर आंबेकर,  जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे संशोधन अधिकारी रामचंद्र जायभाये , नगरप्रशासन अधिकारी सुप्रिया टवलारे, राष्ट्रीय नमुना  पाहणी संघटनेचे क्षेत्रीय कार्य अधिकारी  एन.एस. मुळे , व्ही. सेहगल, कॉमन सर्व्हिस सेंटरचे निलेश  इंगळे,  महानगरपालिकेचे  अनिल बिडवे, यांची प्रमुख उपस्थिती होती.   
            केंद्र शासनातर्फे सातवी आर्थ‍िक गणनेमध्ये  सर्व उद्योग  ,  व्यवसाय व सेवा यांची गणना प्रत्यक्ष घरोघरी कुटूंबास  व उद्योगास  भेट देऊन करण्यात येत आहे. आर्थ‍िक गणनेचे काम प्रगणका कडुन  केले जात आहे.  या  प्रगणकांना  नागरीकांनी   सहकार्य करून  संपुर्ण  माहिती द्यावी  असे  आवाहन जिल्हाधिकारी  जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. आर्थ‍िक गणनेच्या कामात   कॉमन सर्व्हिस सेंटरला येणा-या अडचणी  यावेळी जिल्हाधिकारी  यांनी  जाणुन घेतल्या  आर्थ‍िक गणनेचे काम  युद्ध पातळीवर करण्याच्या  सुचना यावेळी देण्यात आल्या.  यावेळी  नगरपालीकेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी ,  जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी , महाविद्यालयाचे  सांख्यिकी व  अर्थशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख, पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज