भारताची जनगणना -2021 जनगणनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करा -जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर






अकोला,दि. 26 (जिमाका)- मतदाराच्या  परिसिमा,  लोकसभा, विधानसभा, पंचायत आणि इतर स्थानिक संस्थाचे आरक्ष्‍ाण, प्रभावी सार्वजनिक प्रशासन यासाठी भारताची जनगणना-2021 साठी घरोघरी भेट देऊन माहिती संकलनाचे काम करण्यात येणार आहे.  जनगणनेची अत्यंत प्रभाविपणे  अंमलबजावणी  करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात जिल्ह्यातील व महानगर पालीकेतील सर्व   चार्ज अधिकारी , रेग्युलर असिस्टंट व टेकनीकल असिस्टंट यांचे  जनगणना 2021  साठीचे प्रशिक्षण अयोजीत करण्यात आले आहे. त्यावेळी मार्गदर्शन  करतांना ते बोलत  होते.  यावेळी  उपसंचालक जनगणना रघु अलुमोलू , वरिष्ठ निरिक्षक प्रविण भगत, वरिष्ठ पर्यवेक्षक, एस.एन. कुलकर्णी, पर्यवेक्षक आर .ए. पाढवे, निवासी उपजिल्हाधिकारी  संजय खडसे़, जिल्हा सुचना अधिकारी अनिल चिचोंले यांची प्रमुख उपस्थिती होती.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज