बांधकाम कामगारांना नोंदणीसाठी तालुकानिहाय वेळापत्रक


        अकोला,दि.15(जिमाका)-  अटल विश्वकर्मा सन्मान योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व  इतर बांधकाम   कामगार कल्याणकारी महामंडळांने जाहीर केलेल्या 29 कल्याणकारी योजनांचा लाभ दिला जातो. त्यासाठी बांधकाम  कामगारांनी नोंदणी सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयात सुरू आहे.  कामगार नोंदणीच्या या  कामात सुसूत्रता यावी यासाठी  सहाय्यक कामगार आयुक्त यांनी कामगार नोंदणीसाठी तालुकानिहाय वेळापत्रक जाहिर केले आहे.
                      ते या प्रमाणे सोमवारी  बाळापुर , अकोट  तालुक्यांचे नोंदणी ,  नुतनिकरण, विविध योजने अंतर्गत लाभाचे अर्ज स्विकारावे,  मंगळवारी  मुर्तिजापुर, अकोला , बार्शिटाकळी तालुक्यांचे नुतनिकरण, विविध योजने अंतर्गत लाभाचे अर्ज स्विकारावे,  बुधवारी पातुर, तेल्हारा तालुक्यांचे  नुतनिकरण, विविध योजने अंतर्गत लाभाचे अर्ज स्विकारावे, गुरूवारी सर्व तालुक्यातील  विविध  योजने अंतर्गत लाभाचे अर्जांची त्रुटीची पुर्तता करणे, शुक्रवारी  लाभाचे अर्ज निकाली काढण्याकरीता कार्यालयीन कामकाज, पहिला, तिसरा व पाचवा  शनिवारी  सर्व तालुक्यातील मंडळाचे ओळखपत्र वाटप.  या वेळापत्रकानुसार बांधकाम कामागारांनी सकाळी 10 ते 4 या वेळात हजर राहुन नोंदणी करावी.
                  सहाय्यक कामगार आयुक्त  यांच्या कार्यालयाचा पत्ता:-  सहाय्यक कामगार आयुक्त, श्रद्धा टाईम्स, गौरक्षण रोड, अकोला. या नोंदणीसाठी केवळ 85 रूपये इतके नोंदणी शुल्क आकारले जाते.  त्या व्यतिरीक्त कोणतेही शुल्क आकारले जात नाही. याबाबत सर्वांनी  दक्षता घ्यावी असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त रा. दे. गुल्हाने यांनी केले आहे.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज