महाडिबीटी प्रणालीवर गुरूवार (दि.20) पुर्वी अर्ज महाविद्यालयांनी पाठविण्याचे आवाहन


        अकोला, दि. 6 (जिमाका):  सन 2019-20 या  शैक्षणिक वर्षातील महाडिबीटी प्रणालीवर अनुजाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे भारत सरकार  मॅट्रीकोत्तर  शिष्यवृत्ती  व शिक्षण फी   परिक्षा फी योजनेचे अजुनही बरेच अर्ज  महाविद्यालय स्तरावर प्रलंबीत असल्याने महाविद्यालयाकडे प्रलंबीत असल्याने महाविद्यालयाकडे प्रलंबीत असलेले अर्ज महाविद्यालयांनी  जिल्हा लॉगईनला पाठविण्याकरीता 22 जानेवारी  पर्यंत असलेली मुदत गुरूवार दि. 20 फेब्रूवारी पर्यंत वाढवुन  दिलेली आहे. या संधीचा लाभ जिल्ह्यातील  सर्व महाविद्यालयांनी घेवुन प्रलंबीत असलेले अर्ज दिलेल्या मुदतीत शासन निर्णयानुसार पडताळणी करून जिल्हा कार्यालयाकडे पाठवावे. विहित मुदतीत अर्ज जिल्हा  कार्यालयाकडे सादर न केल्यास विद्यार्थी वंचित राहिल्यास अशा विद्यार्थ्यांची जबाबदारी महाविद्यालयाची राहील याची नोंद घ्यावी, असे आवाहन सहाय्यक   आयुक्त समाज कल्याण  अकोला  यांनी   केले आहे.
.                                                                   00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज