महिलांची शेती शाळा महिलांनी शेती प्रक्रियेत पुढाकार घ्यावा - कृषीमंत्री ना. दादाजी भुसे








      अकोला, दि. 6 (जिमाका): महिलांनी  शेती शाळेतून  प्राप्त होणार ज्ञान आत्मसात करून  कुटूंब व  इतर शेतक-यांचा विकास करावा  यासाठी महिलांनी शेती प्रक्रियेत पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन  कृषीमंत्री ना. दादाजी भुसे यांनी केले.
            मुर्तिजापुर तालुक्यातील सिरसो येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियांनातंर्गत  हरभरा पिकांची महिलांची शेती शाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत  होते.  कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर, संगीत कांबे, कृषी भुषण बाळासाहेब कथलकर,  सिरसोचे सरपंच जयश्री मेहरे,  कृषी सहसंचालक सुभाष नागरे, पोकराचे विषय तज्ञ रफिक नाईकवाडी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे किटक शास्त्रज्ञ डॉ. चारुदत्त ठिपसे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ , उपविभागीय कृषी अधिकारी अजय कुळकर्णी, तालुका कृषी अधिकारी  अमृता काळे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
            शेती शाळेच्या  माध्यमातून  महिलांनी  माती परिक्षण , निंदन, शेतीत फवारणी घेतांना  घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर प्रशिक्षण  सिरसो येथील कृषीसहाय्यक श्रद्धा श्रीधर पवार यांनी दिलेत.
सेवार्थ शेतकरी उत्पादक कंपनी अनभोराच्या प्रकल्पाला
कृषीमंत्री ना. दादाजी भुसे यांची भेट
            गटशेती शेतकरी  सबळीकरण  योजनेतंर्गत सेवार्थ शेतकरी उत्पादक कंपनी अनभोरा ता. मुर्तिजापूर  यांनी  सामुहिक सुविधा केंद्र , दुध संकलन व प्रक्रिया केंद्र , दालमील , हळद , मिरची प्रक्रिया केंद्र ,बियाणे प्रक्रिया केंद्र, तयार केलेले आहे.  गटशेती प्रोत्साहन व सबळीकरणासाठी शेतक-यांच्या शेतीगटात गटशेतीसाठी चालना देण्यासाठी  सेवार्थ अग्रो उत्पादक कंपनी यांना 1 कोटी   67  लक्ष  80 हजार  रूपयाचा प्रकल्प  उभारण्याचे  काम चालु आहे.  आतापर्यंत  शासनाकडुन 84 लक्ष निधी वितरीत करण्यता आलेला आहे. या प्रकल्पाची  भेट देऊन पाहणी कृषीमंत्री ना. दादाजी भुसे यांनी केली.
यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर, संगीत कांबे, कृषी भुषण  बाळासाहेब कथलकर , अनभोराचे सरपंच जयश्री मेहरे,  कृषी सहसंचालक सुभाष नागरे, पोकराचे विषय तज्ञ रफिक नाईकवाडी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे किटक शास्त्रज्ञ डॉ. चारुदत्त ठिपसे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ,उपविभागीय कृषी अधिकारी अजय कुळकर्णी, तालुका कृषी अधिकारी  अमृता काळे हे होते.
यावेळी मार्गदर्शन करतांना कृषीमंत्री म्हणाले की, या प्रकल्पांपासुन  होणारे लाभ  मर्यादीत लोकापर्यंत न राहता तळागाळातील शेतक-यांपर्यत पोहचवावे असे सांगुन  उत्पादक कंपनीत प्रक्रिया  केलेले बियाणे  परिसरातील शेतक-यांना माफक दरात उपलब्ध करून द्यावे. शेतक-यांना दिलासा देण्याचे  काम  उत्पादक कंपनी करेल या प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी सर्व भाग भांडवलदारांनी  प्रयत्नशील राहावे अशी आशा कृषीमंत्री ना. दादाजी भुसे यांनी व्यक्त केली.
                                                                    00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज