जागतिक सुर्य नमस्कार दिनानिमित्य वसंत देसाई स्टेडियमवर सामुहिक सुर्यनमस्कार





अकोला,दि. 1 (जिमाका)-   क्रीडा व युवक सेवा   संचालनालय, अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा  क्रीडा अधिकारी कार्यालय , क्रीडा भारती, नेहरू युवा केंद्र  , अंजिक्य फिटनेस  पार्क, पतंजली योग  समिती व  शारीरिक  शिक्षण  शिक्षक  संघटना  अकोला, पुज्य सिंधी जनरल पंचायत यांच्या यांचे संयुक्त विद्यमाने  आज दिनांक 1 फेब्रूवारी  रोजी रथसप्तमी निमीत्त सकाळी 8.30 वाजता, स्व वसंत देसाई  स्टेडियम अकोला येथे, जागतिक   सुर्यनमस्कार  दिनानिमित्य , सामुहिक  सुर्यनमस्काराचा कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे , तहसिलदार विजय लोखंडे,  शिक्षणाधिकारी माध्यमिक  प्रकाश मुकूंद,  प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुळकर्णी, राज्य क्रीडा मार्गदर्शक सतिश भट , लक्ष्मीकांत यादव ,क्रीडा अधिकारी  चारुदत्ता नाकट, मनिषा ठाकरे , क्रीडा भारतीचे प्रमुख डॉ. पराग टापरे,  शत्रुघ्न बिडकर , सुहास काटे, कन्हेयालाल रंगबाणी , हरिश पारवाणी, बुढन गाडेकर, डॉ. कृष्णमुरारी शर्मा, श्रीकांत देशमुख,  प्रशांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे संचालन  रश्मी जोशी तर उपस्थितांचे आभार क्रीडा अधिकारी दिनकर उगले यांनी मानले.
कार्यक्रमाच्या  यशस्वीतेसाठी जिल्हा क्रीडा कार्यालयाचे रमेश पवार , प्रशांत खापरकर , निशांत वानखडे, अंजिक्य  घेवडे,  धिरज चव्हाण, अशोक वाठोरे ,  यांनी प्रयत्न केले.
या कार्यक्रमामध्ये, एन.सी.सी कॅडेट, स्काऊट व गार्डन, सांस्कृतिक व योग केंद्र  योग भारती , स्वयंसिध्दा , विविध  एकविध खेळ संघटनेचे प्रतिनीधी, सर्व  व्यवस्थापनाचे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, विविधि   शासकीय / खाजगी विभागाचे अधिकारी,  कर्मचारी, विविध  एकविध खेळ संघटनेव्दारा राबविण्यात येत असलेल्या क्रीडा  प्रशिक्षण केद्रांचे प्रशिक्षणार्थी , विविध क्रीडामंडळे, निरंकारी मंडळ, नागरीक  तसेच  क्रीडाप्रेमी   सहभागी  झाले होते.
********

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज