पंडीत दिनदयाल उपाध्‍याय रोजगार मेळावा सोमवारी (दि.17) तेल्हारा येथे आयोजन



अकोला,दि.14(जिमाका)- जिलहयातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीच्‍या संधी उपलब्‍ध व्‍हाव्‍यात या उद्येशाने जिल्‍हा कौशल्‍य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र , अकोला. आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था , तेल्‍हारा व अकोट जि. अकोला. यांचे सयुक्‍त विद्यमाने आयोजित पंडीत दिनदयाल उपाध्‍याय रोजगार मेळावा सोमवार  (दि.17) रोजी सकाळी 10 वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था, थार एम.आय.डी.सी. ,शेगांव रोड , तेल्‍हारा येथे आयोजित करण्‍यात आलेला आहे.                                               
            या मेळाव्‍यामध्‍ये  नामांकित खाजगी उद्योजक / कंपनी / त्‍यांचे प्रतिनिधी एकुण ३०० पेक्षा अधिक पदासाठी भरती प्रक्रिया राबव‍तील. यात खंडेलवाल ऑटोव्हिल्‍स , रतनलाल प्‍लॉट , अकोला. (एकुण-०९पदे दहावी /बारावी /पदवीधर ), भारतीय जिवन विमा निगम , अकोला.( एकुण २५ पदे / दहावी /बारावी पदवीधर ) , युरेका फोर्ब्‍स , अकोला करीता  ( एकुण पदे ३० किमान दहावी / बारावी ) ,  धुत ट्रान्‍समिशन , औरंगाबाद ( एकुण १०० पदे आय.टी.आय.कोणताही ट्रेड पास /दहावी /बारावी/पदवीधर) , नाहार्स इंजिनियरींग ,औरंगाबाद (एकुण १२५ पदे  दहावी /बारावी/आय.टी.आय.पास कोणताही ट्रेड ) , मॉर्डन सेक्‍युरीटी फोर्स , हैद्राबाद ( दहावी / बारावी / पदवीधर ) यांचा सहभाग राहील . पात्र पुरुष व महिला उमेदवारांच्‍या मुलाखती घेण्‍यात येतील व त्‍याच दिवशी निवड करण्‍यात येईल .
            कौशल्‍य विकास व उद्योजकता विभागाच्‍या -  www.mahaswayam.gov.in या संकेतस्‍थळावर नांव  नोंदणी केलेल्‍या दहावी/ बारावी / पदवी / पदवीका /आयटीआय पास / पदवीत्‍तर पुरुष तसेच  महिला  उमेदवारांना यात सहभागी होऊन रोजगार प्राप्‍त करण्‍याची संधी उपलब्‍ध झालेली आहे .
            पात्र उमेदवारांनी आपल्‍या शैक्षणीक पात्रतेची सर्व मुळ प्रमाणपत्र ( सत्‍य प्रतिलिपी ) नुकतीच काढलेली पासपोर्ट आकाराची छायाचित्रे व सेवायोजन कार्डासह सोमवार  (दि.17) रोजी सकाळी १०.०० वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था, थार एम.आय.डी.सी. शेगांव रोड ,तेल्‍हारा येथे  उपस्थित राहावे असे आवाहन सहायक आयुक्‍त  सु.रा.झळके , जिल्‍हा कौशल्‍य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अकोला .यांनी केले आहे.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज