ना.धोत्रे यांनी घेतला विविध प्रकल्पांचा आढावा







अकोला,दि.12(जिमाका):   केंद्रीय मानव संसाधन विकास, दुरसंचार,  इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान  राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांनी  आज  जिल्ह्याशी निगडीत विविध  प्रकल्पांचा आढावा घेतला.
या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात आढावा सभेचे आयोजन  करण्यात आले होते. यावेळी आ. गोवर्धन शर्मा,  आ. रणधीर  सावरकर, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाळ, रेल्वेचे भुसावळ येथील सहाय्यक  वाहतुक प्रबंधक  अनिल बागले,  अकोला स्टेशन मास्तर ए.एस. नांदुरकर आर.के.  पाण्डेय, ए.ए.मधु,  मो. रामिन अन्सारी  राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अरविंद गांधी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता गिरीश जोशी , एस. जी. धिवरे,  उपविभागीय  अभियंता राजेश नवलकार, जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथ)  प्रकाश मुकूंद , उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जिचकार तसेच विविध विभागांचे विभागप्रमुख,  मालवाहतुकदार संघटनेचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
 यावेळी ना. धोत्रे यांनी अकोला रेल्वेस्थानक येथील मालधक्का स्थलांतराबाबत, रेल्वे,  डाबकीरोड, तापडीया  नगर,  अकोट येथील उड्डाणपुल तसेच  जिल्ह्यातील रस्ते निर्मितीबाबतचा आढावा घेतला. तसेच  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना,  आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री मातृवंदना योजना , बेटी  बचाव बेटी पढाओ,  पोषण अभियान, केंद्रीय विद्यालय यासंदर्भात आढावा घेतला. सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखुन जिल्ह्यातील प्रकल्प मार्गी लावावे, असे निर्देशही ना. धोत्रे यांनी दिले.
                                                        00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज