कृषी मंत्री ना.दादाजी भुसे यांचा जिल्हा दौरा


अकोला,दि. 4 (जिमाका)-  राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण  मंत्री हे बुधवार दि. 5 रोजी जिल्हा  दौ-यावर  येत आहेत, त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम  याप्रमाणे.
बुधवार दि. 5 रोजी मुंबई येथून सकाळी 6.05 वा. डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ येथे  आगमन व राखीव. सकाळी 9.30 ते  11.25  पर्यंत डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ येथील दिक्षांत समारंभास उपस्थिती.  दुपारी 1 ते 4.30 डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ  येथील समिती  सभागृहास अमरावती विभागातील कृषि अधिका-यांशी आढावा बैठक. 5.15 ते 7 वाजेपर्यंत महाबीज भवन येथे  महामंडळाची पाहणी व बैठक. रात्री डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ येथे राखीव व मुक्काम.
गुरूवार दि. 6 रोजी सकाळी 8.20 वाजता अपोती गावसमुह ता. अकोला येथे नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्पातंर्गत गावातील उपक्रमांची पाहणी व घुसर- आपोती गावसमुहामधील ग्राम कृषि संजीवनी समितीच्या सदस्यांसोबत चर्चा. सकाळी 11.30 वाजता अंभोरा येथे सेवार्थ शेतकरी उत्पादक कंपनी    सामुदायीक कृषि सल्ला सेवा केंद्र , मिर्ची  प्रक्रिया उद्योग व  विपणन करणा-या शेतकरी उत्पादक कंपनीस  भेट व चर्चा. दुपारी  12.20 वाजता  राष्ट्रीय सुरक्षा मोहिमतंर्गत  शेती शाळा (हरभरा) सिरसो ता.मुर्तिजापूर येथे भेट व चर्चा दुपारी 1.30 वाजता सिरसो मुर्तिजापुर येथून शासकीय मोटारीने  अमरावती कडे प्रयाण करतील.
00000


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज