विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागासवर्गीयासाठी कन्यादान योजना


अकोला,दि. 3 (जिमाका)-  विमुक्त जाती,  भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय व विशेष                          मागास प्रवर्गासाठी  शासनाचे  कल्याण विभागामार्फत 2 फेब्रूवारी 2019 पासुन सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये              भाग घेऊन  विवाह करणा-या  विमुक्त जाती व भटक्या जमाती,  इतर मागासवर्ग प्रवर्ग व  विशेष                            मागास प्रवर्गाकरिता कन्यादान योजना नव्याने सुरू करण्यात आलेली आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र       शासनाच्या  www.maharashtra.gov.in  या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असुन त्यांचा संगणक  सांकेतांक  क्रमांक  201902021606329922 असा आहे.
सदर शासन निर्णयानुसार  विमुक्त जाती व भटक्या जमाती,  इतर मागासवर्ग प्रर्वग व विशेष मागास प्रर्वगाकरिता संस्थेमार्फत सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करून लाभार्थ्यांना  शासना मार्फत  20 हजार रूपये अनुदान व संस्थांना प्रत्येक  जोडप्यामागे 4 हजार रूपये  असे देय आहे. तरी सदर योजनेचे लाभाकरिता शासन निर्णयातील अटी व शर्ती नुसार संस्थेने या कार्यालयाची पुर्व परवानगी घेवून सामुहिक विवाह सोहळा  आयोजन करून  प्रस्ताव या कार्यालयात सादर करण्यात यावे, असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, अमोल यावलीकर यांनी कळविले  आहे.
                                                                         00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज