पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चु कडू यांचा जिल्हा दौरा


अकोला,दि. 1 (जिमाका)- राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास , शालेय शिक्षण,  महिला व बालविकास  इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती,  भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण,  कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.  ओमप्रकाश उर्फ  बच्चू कडु  हे रविवार दि. 2 रोजी जिल्हा दौ-यावर  येत आहेत. त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम  याप्रमाणे.
रविवार दि. 2 रोजी सकाळी सव्वा आठ वा. नरनाळा किल्ला  येथे आगमन व संपुर्ण परिसराची पाहणी, सकाळी सव्वा अकरा वा. शासकीय विश्रामगृह शहानूर ता. अकोट येथे नरनाळा किल्याचे  दुरूस्ती/ सौंदयींकरण व  सदर परिसर पर्यटनकेंद्र म्हणुन  घोषित करण्याबाबत संबंधीत अधिकारी यांच्या सोबत  चर्चा.  दुपारी  सव्वा  वाजता  अकोला इंडस्ट्रीज असोशिएशन, अपु पाँईट एमआयडीसी येथे  आयोजीत कार्यक्रमास उपस्थिती  दुपारी  दोन वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजीत शिक्षण विभाग प्राथमिक / माध्यमिक (सुंदर शाळा , बोलक्या शाळा, शिष्यवृत्ती , गणवेश , शाळा खोल्यांची दुरूस्ती इ.), आरोग्य विभाग, शहिद स्मारक , नव्याने सुरू करण्यात आलेली मंगेश योजना , जिल्हा निबंधक सहकारी संस्था आदि विभागाच्या  बैठकीस उपस्थिती.
सायंकाळी सात वाजता जानोरकर मंगल कार्यालय समोर , रिंग रोड, तुकाराम चौक अकोला येथे आयोजीत  श्री सत्यपाल महाराज यांच्या किर्तन कार्यक्रमास उपस्थित राहतील.  रात्री  साडेआठ वाजता  माजी मंत्री  श्री. गुलाबराव गांवडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट. सोईनुसार  मुर्तिजापूर मार्गे  अमरावतीकडे  रवाना.
00000


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज