बुधवार (दि.5) रोजी पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन


अकोला,दि. 3 (जिमाका)-  अकोला जिलहयातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशानेजिलहा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र अकोला. आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षणसंस्था, अकोला. यांचे सयुक्त विद्यमाने आयोजित पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा बुधवार दि.5  रोजी सकाळी १०.०० वाजता शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्था मुलांची रतनलाल प्लॉट नविन बसस्टॅण्ड चे मागे , अकोला. येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
या मेळाव्यामध्ये सहा नामांकित खाजगी उद्योजक ,कंपनी त्यांचे प्रतिनिधी एकुण १९० पेक्षाअधिक पदासाठी भरती प्रक्रिया राबविणार आहे. या मेळाव्यात  सुझूकी मोटर्स गुजरात प्रा.लि. (एकुण ७५ पदे आय.टी.आय. कोणताही ट्रेड ,  इनोट्रो मल्टीसहीसेस प्रा.लि.अकोला ( एकुण १० पदे बीई/बीएससी/एमएससी/ दहावी/बारावी पदवीधर ) मॉर्डन सेक्युरीटी सर्व्हिस प्रा.लिमी. हैद्राबाद ( एकुण पदे ५० किमान दहावी / बारावी तसेचबेसीक इंग्रजी येणे आवश्यक) , लिबेन लाईफ सायन्स लि. अकोला ( एकूण पदे ०३आय.टी.आय.इलेट्रीकल ट्रेड/इलेक्टानिक्स ट्रेड/इलेक्ट्रीकल पदवी / पदवीका ) , साईश्रध्दा इंटरप्रायजेस प्रा.लि.पुणे (एकूण पदे ५० दहावी/बारावी/ आय.टी. आय. पास कोणताही ट्रेड ) , युरेका फोर्स प्रा.लि. अकोला करीता ( दहावी | बारावी / पदवीधर ) यांचा सहभाग राहील. पात्र पुरुष व महिला उमेदवाराच्या मुलाखती घेण्यात येतील व त्याच दिवशी निवड करण्यात येईल.कौशल्य विकास व उदयोजकता विभागाच्या - www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नांव नोंदणी केलेल्या दहावी/ बारावी/ पदवी / आयटीआय पास/ पदवीत्तर पुरुष तसेच महिला उमेदवारांना यात सहभागी होऊन रोजगार प्राप्त करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे
पात्र उमेदवारांनी  आपल्या शैक्षणीक पात्रतेची सर्व मुळ प्रमाणपत्र ( सत्य प्रतिलिपी) नकतीच काढलेली पासपोर्ट आकाराची छायाचित्रे व सेवायोजन कार्डासह बुधवार दि. 5 रोजी सकाळी 11 वाजता शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.) मुलाची ,रतनलाल प्लॉट ,नविन बस स्टॅण्ड चे मागे . अकोला.येथे उपस्थित राहावे ,असे आवाहन  जिल्हा कौशल्य विकास रोजगारउद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक सु.रा.झळके यांनी केले आहे.
                                                                            00000



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज