सावकारी कर्जमाफी अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध


        अकोला,दि. 1 (जिमाका)-    तालुका पातुर येथील सावकारी   कर्जमाफी अंतर्गत  प्रथमदर्शनी पात्र लाभार्थी यांची  यादी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, पातुर परमाळे यांची ईमारत पहिला   मजला टि.  के. व्ही. चौक अकोला नाका पातुर येथील कार्यालयात  प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तथापि उक्त यादी मधील व्यक्ती शासन   निर्णया नुसार निकषाची पुर्तता बाबत पडताळणी केल्यावरच पुढील कार्यवाही करणे आवश्यक आहे.
            परंतू सदरहू यादी मध्ये समाविष्ट  असलेल्या लाभार्थीचा  पत्ता योग्य  नसल्याने त्याची पात्रते बबत निकशाची पुर्तता, तपासणी होवू शकत नाही.
            याव्दारे सहाय्यक निबंधक  सहकारी संस्था , पातुर परमाळे यांची  ईमारत  पहिला  मजला टि. के.व्ही.  चौक अकोला नाका पातुर येथील  कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादी मधील आपल्या नांव, गांव, संपुर्ण पत्ता याची  शहानिशा करुन, आवश्यक माहिती तीन दिवसाचे आत कार्यालयास पुरवावी. जेणे करून  सावकारी  कर्जमाफी संबंधाने पुढील कार्यवाही सत्वर होवु  शकेल, असे सावकारांचे निबंधक तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पातुर यांनी कळविले आहे.
                                                                       00000


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज