गुरूवार (दि.27) रोजी मुल्यवर्धन मेळावा


            अकोला,दि.25 (जिमाका) – जिल्हा परिषदेच्या  महानगरपालिकांच्या शाळामध्ये शिक्षकांमध्ये  विद्यार्थ्यांमध्ये  होत असलेले परिवर्तन  सर्वसामान्य  जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी  गुरूवार (दि.27) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात सकाळी  10 वाजता मुल्यवर्धन मेळावा गौरक्षण संस्थानच्या मागील मैदानावर सकाळी साडेनऊ वाजता प्रदर्शन आयोजित केले आहे, असे  जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. एस. डी. डुकरे यांनी कळविले आहे.
            महाराष्ट्र शासन  आणि  शांतीलाल मुथ्या फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या    मनपाच्या  सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते  पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी  मुल्यवर्धन हा कार्यक्रम जानेवारी 2016 पासुन टप्याटप्याने राबविण्यात आला. या कार्यक्रमाची माहिती सर्वसामान्य जनतेला होण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात  आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज