हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स कंपन्यांचे व्यवहार तपासा- पालकमंत्री ना. कडू

अकोला,दि.२०(जिमाका)- हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो फायनान्स कंपन्यांमार्फत देण्यात येणारे कर्ज व त्याची होणारी नियमबाह्य व अव्वाच्या सव्वा वसूली बाबत अनेक तक्रारी आहेत. या तक्रारींची व त्या अनुषंगाने हुंडी चिठ्ठी व मायक्रो फायनान्स कंपन्यांचे व्यवहार तपासावे, असे निर्देश राज्याचे  जलसंपदा व लाभक्षेत्र विकास , शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू  यांनी आज येथे दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज यासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार,  निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे,  जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. प्रवीण लोखंडे, जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक आलोक तारेनिया तसेच अन्य विभागप्रमुख उपस्थित होते.
 यावेळी शेतकऱ्यांना हुंडीचिठ्ठीद्वारे कर्ज देऊन त्याची अव्वाच्या सव्वा वसूली केली जात असल्याच्या तक्रारी निदर्शनास आल्या आहेत. याबाबत जिल्हा उपनिबंधकांनी अहवाल सादर केला.  त्यावर पालकमंतत्री ना. कडू यांनी निर्देश दिले की,  तक्रारींच्या अनुषंगाने कारवाई करतांना, झालेल्या व्यवहाराच्या अनुषंगाने जमीन व अन्य प्रकारची काही खरेदीचे व्यवहार झाले असल्यास त्याचीही तपासणी करावी . तसेच मायक्रो फायनान्स कंपन्यांचे व्यवहारही तपासावेत असे निर्देश ना. कडू यांनी दिले. त्या अनुषंगाने प्राप्त तक्रारींच्या कारवाईचा अहवालही सादर करावा, अशा सुचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज