विटभट्टी कामगारांच्या मुलांना शाळेपर्यंत ने आण करण्यासाठी वाहतुक व्यवस्था करा- पालकमंत्री ना. बच्चू कडू यांचे निर्देश


अकोला,दि.२०(जिमाका)- जिल्ह्यातील विटभट्ट्यांवर काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी  त्या मुलांना पालकांचे मुक्कामाचे ठिकाण ते जवळची शाळा इथपर्यंत ने आण करण्यासाठी  वाहतुक व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देश राज्याचे  जलसंपदा व लाभक्षेत्र विकास , शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू  यांनी आज येथे दिले.
 या संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार,  निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा शिक्षणाधिकारी माध्यमिक श्रीमती वैशाली ठग व जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक प्रकाश मुकुंद आदी उपस्थित होते.
यावेळी  जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील विटभट्ट्या व तेथील कामगारांची मुले कोणत्या शाळेत शिकतात याचा आढावा घ्यावा. तसेच त्यामुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी त्यांचे नाव नजिकच्या शाळेत घालून तेथ पर्यंत त्यांची ने आण व्यवस्थेसाठी वाहतुकीची सोय करावी. ही सोय १ मार्च पर्यंत व्हावी, असे निर्देश ना. कडू यांनी यावेळी दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज