कृषि विभागाचा लोगो सुधारीत लोगो तयार करण्यासाठी स्पर्धा


            अकोला,दि. 26 (जिमाका)- कृषि विभागाच्या लोगो प्रचलित असून कार्यालयीन कामकामाकरीता वापरण्यात येतो. सद्या कृषि क्षेत्रात  आधुनिक तंत्रज्ञान ,  माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून शेतक-यांच्या हितासाठी विविध योजना राबविण्यात येतात, त्याअनुषंगाने प्रचलित लोगोमध्ये बदल करून नव्याने लोगो करण्याचे प्रस्तावित आहे. तरी लोगोमध्ये सुधारण करून डिटीपी , डिझाईन चे सॉफ्ट व हार्ड रंगीत  कॉपी कृषि माहिती विभाग, कृषि भवन, २ रा मजला, शिवाजीनगर पुणे येथे सक्षम व  ddinfor@gmail.com या ई-मेलद्वारे दि. २५ मार्च पर्यंत पाठविण्यात यावा, उत्कृष्ठ लोगो तयार करणा-या व्यक्ती/ संस्था/फर्म यांना रु. 1,00,000/-(रू.एक लाख रक्कम) पारितोषिक देऊन विजेता म्हणून घोषित करण्यात येईल. तसेच सदर लोगो वापरण्याचे स्वामित्व हक्क कृषि विभागाकडे राहील याची नोंद घ्यावी, अधिक माहितीसाठी कृषि उपसंचालक माहिती, कृषि भवन ,कृषि आयुक्तालय पुणे येथे  तसेच  कार्यालयीन क्रमांक  020-25537865  किंवा मोनं 9823356835 या क्रमांकावर संपर्क साधावा.   
                                                                                   00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज