महात्मा फुले कर्जमुक्ती योजना बँकांनी कर्जमुक्ती पात्र शेतकऱ्यांची अर्ज पोर्टलवर अपलोड करा , जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे निर्देश


            अकोला, दि. 7 (जिमाका): महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 1 लक्ष 13 हजार 469 कर्ज मुक्ती साठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांपैकी 1 लक्ष 6 हजार 527 शेतकऱ्यांचे अर्ज बँकांनी अपलोड केले आहेत .उर्वरित कर्जमुक्ती साठी पात्र शेतकऱ्यांची अर्ज त्वरित अपलोड करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत .
जिल्हाधिकारी यांच्या दालनात कर्जमुक्ती योजने संदर्भात बँक अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे तसेच बँकांचे अधिकारी उपस्थित होते
 राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकांनी 37 हजार 247, जिल्हा मध्यवती सहकारी बँकांनी 57 हजार 207 व विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने  12 हजार 73 शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड केल्या आहेत. याद्या अपलोड करण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर असून पुढील 3 दिवसात कर्ज मुक्ती साठी पात्र शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याची कार्यवाही पूर्ण होईल ,अशी माहिती यावेळी देण्यात आली.
                                              000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम