जिल्हाधिकारी पापळकर आज (दि.१४) आकाशवाणीवर


            या संदर्भात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत सविस्तर माहिती देणारी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. प्रविण लोखंडे यांची मुलाखत आकाशवाणी अकोला केंद्रावरुन  प्रसारित होणार आहे. ही मुलाखत शुक्रवार दि.१४ रोजी सायं. साडेसात वाजता किसानवाणी या कार्यक्रमात प्रसारित होणार आहे. आकाशवाणी अकोला केंद्राचे कार्यक्रम विभागप्रमुख  विजय दळवी यांनी या मुलाखतीचे संचलन केले आहे. ही मुलाखत आकाशवाणी अकोला केंद्राच्या एफ एम बॅंड १०२.४ मेगाहर्ट्ज वर ऐकता येईल. तसेच आकाशवाणीच्या newsonair या ॲपवरही ऐकता येईल असे विजय दळवी यांनी कळविले आहे. शेतकऱ्यांनी ही मुलाखत ऐकून माहितीचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना