सौजन्यशील पिढी घडविण्यासाठी ‘मूल्यवर्धन’ उपयुक्त-जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 अकोला,दि. २७(जिमाका)-जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये मूल्यवर्धन कार्यक्रम मोठ्या प्रमाणात  राबविण्यात येत आहे.  आज शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमधून भावी समाजासाठी सौजन्यशील पिढी घडवायची असेल तर ‘मूल्यवर्धन’ हा उपक्रम अत्यंत उपयुक्त असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी  जितेंद्र पापळकर यांनी आज येथे केले.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे व  शांतीलाल मुथ्था फाउंडेशन यांच्यावतीने  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात ‘मूल्यवर्धन’
जिल्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी मनपा आयुक्त संजय कापडणीस,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. सुभाष पवार , शिक्षणसभापती चंदशेखर पांडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, मुथ्था फाउंडेशनचे  शांतीलाल मुथ्था, डायटचे प्राचार्य डॉ. समाधान डुकरे, शिक्षणाधिकारी  प्रकाश मुकूंद, प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठग,  मुथ्था  फाउंडेशनचे जिल्हा प्रमुख सुभाष गादीया  यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी पापळकर म्हणाले की,  गेल्या चार पाच वर्षापासुन  जिल्हा परिषदेच्या शाळेत मुल्यवर्धनाचे  काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. त्यामुळे  जिल्हा परिषदेच्या  शाळेच्या पटसंख्येत लक्षणीय  वाढ झाली आहे.  विद्यार्थ्यांमध्ये मूल्य आज रूजवावी लागतील त्याचे परिणाम त्यानंतर काही वर्षात दिसून येतील.  अशी सृजनशील व सौजन्यशील पिढी घडविण्याचे कार्य शांतीलाल मुथ्था यांनी केले आहे, असे गौरवोद्गारही काढले.
यावेळी बोलतांना शांतीलाल मुथ्था म्हणाले की, प्रेरकामुळे मूल्यवर्धन कार्यक्रम यशस्वी झाला असू  या कार्यक्रमाचा दूरगामी परिणाम काही वर्षात दिसून येईल. यावेळी शिक्षणसभापती चंद्रशेखर पांडे ,मनपा आयुक्त संजय कापडणीस,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. सुभाष पवार यांनीही आपले  मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन डायटचे गोपाल सुरे यांनी केले. यावेळी जिल्ह्यातील मुल्यवर्धन कार्यक्रम राबविणाऱ्या काही उत्कृष्ठ शाळांच्या  चित्रफितीही उपस्थितांना दाखविण्यात आल्या.   यावेळी मुल्यर्धन कार्यक्रम राबविणाऱ्या शाळेतील  प्रेरक    शिक्षकांनी स्वानुभव कथन केले. या कार्यक्रमात  जिल्हा परिषद  व महानगरपालिकांच्या शाळेतील शिक्षक /शिक्षिका उपस्थित होत्या.
०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज