एकल महिलांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध -महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर




अकोला,दि. 29 (जिमाका)-  समाजातील विधवा, परिपक्वता व  एकल महिलासाठी शासनाच्या विविध योजना आहे. एकल महिलांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याच्या महिला व बाल विकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले.
जिल्हा परिषद कर्मचारी सभागृहात आयोजीत शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबियासोबत संवाद साधण्यासाठी आयोजीत  संवाद मेळावा कार्यक्रमात त्या बोलत होते.  यावेळी जिल्हा परिषद सदस्य  अर्चना राऊत,  सेवानियुक्त उपजिल्हाधिकारी अशोक अमानकर,  माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, माजी आमदार नातेकोद्दीन खतीब, हिदायत पटेल, विजय अभोरे, बबनराव चौधरी, देवानंद पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
 आत्महत्याग्रस्त कुटूंबातील महिलांना धीर देतांना ॲड. यशोमती ठाकूर म्हणाल्या की, आयुष्यात आलेले दु:ख धुणे धुण्यासारखे धुवून टाकावे, पिळून टाकावे, झटकून टाकावे व  पुन्हा उमेदीने उभे राहावे, संकटाला सामोरे जावे अशा शब्दात त्यांनी धिर दिला.
 विचारांची व कार्याची भुक लागली पाहिजे तर सर्व संकटे आत्म सन्मानाने दुर होतील शासनाला आत्महत्याग्रस्त  शेतकरी , शेतमजूर महिलासाठी काय करता येईल.  यासाठी संवाद  साधुन नियोजन करता येईल. असे  सांगुन ॲड. यशोमती ठाकूर म्हणाल्या की,  आज प्राप्त झालेली सर्व निवेदन  जमा करून  माझ्याकडे पाठवा या निवेदनावरून महिलासाठी  सर्वव्यापी धोरण ठरविता येईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
 जामठी येथील  पायल रडके या मुलीच्या आई व वडीलांनी आत्महत्या केली  त्यामुळे  त्या  अनाथ झाली आहे.  या दोन  बहिणीच्या शिक्षणाचा  सर्व खर्च उचलण्याची जबाबदारी घेण्यात येणार असल्याचे ॲड. ठाकूर यांनी सांगितले.
आत्महत्याग्रस्त  कुंटूंबातील पायल रडके, शितल पवार, शालु चव्हाण या  महिलांनी आपल्या व्यथा यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक अमानकर यांनी तर सुत्र संचालन  डॉ. सुधिर ढोणे यांनी केले. उपस्थितांचे आभार सुभाष कोरपे यांनी मानले.
 यावेळी आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटूंबातील व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित  होते.           00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज