अवैध सावकारी संदर्भातील तक्रारी मंगळवार (दि.१८) पर्यंत पाठविण्याचे आवाहन


अकोला,दि.१४(जिमाका)-  हुंडाचिठ्ठी संदर्भात अवैध सावकारी व्यवहारांची चौकशी करण्यासाठी अवैध सावकारी बाबतच्या तक्रारी येत्या मंगळवार दि.१८ पर्यंत पाठवाव्यात असे आवाहन हुंडी चिठ्ठी अभ्यास गट/चौकशी समिती तथा सहाय्यक निबंधक , सहकारी संस्था पातुर यांनी केले आहे.
जिल्ह्यातील हुंडीचीठ्ठी संबंधीत अवैध सावकारी व्यवहारांची चौकशी करण्याकरीता  जिल्हाधिकारी यांचे आदेशान्वये जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अकोला यांच्या अध्यक्षतेखाली हुंडी चिठ्ठी अभ्यास गट/ चौकशी समिती गठीत  करण्यात आलेली आहे.
त्या अनुषंगाने आज या समितीची प्रथम सभा पार पाडली. या सभेमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार अकोला जिल्ह्यातील सर्व जनतेला याद्वारे   असे आवाहन करण्यात येत  आहे की, हुंडीचिठ्ठीशी संबंधीत अवैध सावकारी व्यवहारासंबंधात आपल्या  तथ्य  आधारीत  स्पष्ट तक्रारी लेखीस्वरूपात  पुराव्यानिशी अर्जामध्ये आपला पत्ता संपर्क  क्रमांकासह, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अकोला , सहकार संकुल, आदर्शकॉलनी अकोला तथा अध्यक्ष हुंडी चिठ्ठी चौकशी समिती असा  स्पष्ट उल्लेख करून गोपानीय सिलबंध पाकीटात मंगळवार,दि.१८ पर्यंत जिल्हा उपनिबंधक सहाकारी संस्था  अकोला, सहकार संकुल, आदर्श कॉलनी अकोला  या पत्यावर पाठविण्यात  याव्यात  वा स्वत: दाखल कराव्यात, असे हुंडी चिठ्ठी अभ्यास गट/चौकशी समिती तथा सहाय्यक निबंधक , सहकारी संस्था पातुर यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज