महाशिवरात्रीच्या दिवशी शहरातील वाहतुकीत बदल


अकोला,दि. 18 (जिमाका)- श्री. राजराजेश्‍वर हे पुरातन मंदिर असून हिंदु धर्मीयांचे आराध्‍य दैवत आहे. या परिसरात जयहिंद चौक शिवाजी नगर, किल्‍ला चौक, अलका बॅटरी अशी दाट वस्‍ती असुन मंदिरापर्यंत जोडणारे सर्व मार्ग अरुंद आहेत. महाशिवरात्रीचे दिवशी सर्व वयोगटातील स्‍त्री-पुरुष मोठया संख्‍येने श्री. राजराजेश्‍वर मंदिरात दर्शनाकरिता येतातत्‍यामुळे या ठिकाणी यात्रेचे स्‍वरुप निर्माण होतेकायदा व सुव्‍यवस्‍थेच्‍या दृष्‍टीकोनातून वाहतुकीचे नियमन व नियोजन करणे आवश्‍यक आहे.  याकरीता  शुक्रवार दि. 21 रोजी  अकोला शहरातील काळा मारोती टर्न जयहिंद चौक राजराजेश्‍वर मंदिर- किल्‍ला चौक या मार्गाने होणारी वाहतूक सकाळी 5 वाजेपासुन रात्री 12 वाजेपर्यंत  खालील नमूद पर्यायी मार्गाने वळविण्‍यात आली आहे.
            पर्यायी वाहतुक मार्ग
            .क्र.
सध्‍या सुरु असलेला मार्ग
.क्र.
पर्यायी मार्ग
अकोला बस स्‍थानक- गांधी चौक कोतवाली चौक- किल्‍ला चौक भांडपुरा चौक बाळापुर नाका अथवा डाबकी रोडकडे जाणारी व येणारी वाहतुक.
अकोला बस स्‍थानक-गांधी चौक कोतवाली चौक काळा मारोती टर्न श्रीवास्‍तव चौक डाबकी रोड.

अकोलाबस स्‍थानक गांधी चौक कोतवाली चौक किल्‍ला चौक भांडपुरा चौक बाळापुर अथवा डाबकी रोड कडे जाणारी व येणारी वाहतुक.
अकोला बस स्‍थानक अशोक वाटीका चौक जेल चौक लक्‍झरी स्‍टॅंन्‍ड चौक वाशिम बायपास चौक बाळापुर नाका कडे.
अथवा
अकोला बस स्‍थानक अशोक वाटीका चौक सरकारी बगीचा खोलेश्‍वर रोड रामसेतु किल्‍ला चौक भांडपूरा चौक डाबकी रोड कडे.
वाशिम बायपास चौक हरीहरपेठचौक- किल्‍ला चौक जयहिंद चौक कोतवाली चौक कडे जाणारी व येणारी वाहतुक
वाशिम बायपास चौक हरीहरपेठ चौक रामसेतु- खोलेश्‍वर रोड कोतवाली चौक कडे जाणारी व येणारी वाहतुक याच मार्गाने वळविण्‍यात  येईल.

00000



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज