शेतक-यांना गुणवत्तापुर्वक बियाणे मिळण्यासाठी महाबिज अग्रेसर - कृषीमंत्री दादाजी भुसे






अकोला, दि. 6 (जिमाका):  महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या राज्याच्या बियाणे उत्पादनात 40 टक्के हिस्सा असुन गुणवत्तापुर्वक बियाणे मिळण्यासाठी महाबिज  अग्रेसर असल्याचे प्रतिपादन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केले.
महाबिजच कामकाजाचा आढावा घेण्यासाठी महबिज कार्यालयामध्ये  बुधवार (दि. 5 )रोजी आढावा  बैठक घेण्यात आली त्यावेळी मागदर्शन करतांना ते बोलत होते यावेळी आमदार नितीनकुमार देशमुख, महाबिजचे व्यवस्थायिक संचालक अनिल भंडारी, कृषि सहसंचालक  सुभाष नागरे, डॉ.  पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाचे  संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, विस्तार संचालक डॉ. मानकर, महाव्यवस्थापक (उत्पादक) एस.एम. फुंडकर, महाव्यवस्थापक  (गुणनियंत्रण व प्रशासन)  डॉ. पी.एस. लहाने, महाव्यवस्थापक (वित्त) एम.आर. यादव, महाव्यवस्थापक (प्रक्रिया) पि.पि. पागृत, , कंपनी सचिव पि.एच. वर्मा यांची उपस्थिती होती.
शेतक-यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी महाबिज, कृषी विद्यापीठ व कृषी विभागाने संयुक्तपणे काम करण्याची गरज असण्याचे सांगुन  कृषीमंत्री  श्री. भुसे पुढे म्हणाले की, विद्यापिठाने जागतिक पातळीवर सुरू असलेल्या  संशोधनाची मदत घेऊन उत्तम प्रतीचे वाण तयार करण्यासाठी संशोधन करावा.
 महाबिजने आपल्या भाजीपाला बियाण्याचा वाटा वाढवावा असे कृषीमंत्री ना.भुसे यांनी सांगितले. कृषीमंत्री  ना. भुसे यांनी महाबिजचा आढावा घेतला.
व्यवस्थापिक संचालक अनिल भंडारी यांनी कर्जत , बुलडाणा , वाशिम  , खंडाळा (अहमदनगर) हिंगोली या पाच ठिकाणी  12500 क्विटंल साठवण क्षमतेच्या गोडाऊन तयार करण्याच्या  प्रस्तावित  असल्याचे सांगुन शिवणी (अकोला)  येथे सौर उर्जेवर  चालणारे  वातानुकूलीत  व आर्द्रतारहीत गोडाऊन बांधुन तयार असल्यांचे सांगितले  यावेळी महाबिजचे अधिकारी उपस्थित होते.
                                                             00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज