मक्यावरील नवीन लष्करी अळीचा प्रादुर्भाव वेळीच उपाययोजना करण्याचे कृषि विभागाचे आवाहन


अकोला,दि. २७(जिमाका)- सद्यस्थितीत मका हे पिक सुरूवातीच्या  पोंगे अवस्थेत  असून या अवस्थेत लषकरी अळीचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते, त्यामुळे त्यावर वेळीच उपाययोजना कराव्या, असे आवाहन जिल्हाधिक्षक कृषि अधिकारी मोहन वाघ यांनी केले आहे.
 यासंदर्भात कृषि विभागाकडून प्राप्त उपाययोजना त्याप्रमाणे- ज्या भागात मागील  हंगामात नवीन लष्करी अळीचा प्रादुर्भाव  झालेला असेल त्यांनी त्वरित एकरी पाच फेरोमन सापळे लावून या किडीच्या पतंगावर नियमित  पाळत ठेवावी व दर आठवड्याने  फेरोमन सापळ्यामध्ये  अडकणारे पतंग नष्ट करावे जसजसे या पतंगाची संख्या वाढेल तसतसे फेरोमन सापळ्याची संख्या एकरी १५सापळे पर्यंत करावी म्हणजे  हे पतंग  मोठ्या  प्रमाणावर नष्ट करणे शक्य होईल व या किडीच्या पुढील पिढ्याची निर्मिती थांबवता येईल. एक मादी चार ते पाच दिवसात सर्वसाधारण  १५०० ते २००० पर्यंत अंडी देऊ शकते. जर  प्रत्येक  नर फेरोमन   सापळ्यात अडकला तर त्याची मादी सोबत  मिलन होणार  नाही परिणामी  किडीची  पुढील  प्रजोत्पादन  थांबून मोठ्या प्रमाणावर पिढ्यांची निर्मिती न होता पिकावर प्रादुर्भावच होणार नाही.
फेरोमन सापळे पिकामध्ये समसमान अंतरावर  लावावे  त्याची  खालील  मेणकापडाचे खालील टोक  किमान पिकाच्या सहा इंच वर राहील या प्रमाणे लावावे.  जशी जशी पिकाची उंची वाढेल तसे फेरोमन सापळ्याची उंची वाढवावी.  प्रत्येक  सापळ्यामध्ये वडी (ल्यूर) लावावी व वडी वरील वेष्टनवर दिलेल्या  अंतिम मुदतीत वडी बदलून  परत नवीन  वडी प्रत्येक  फेरोमन   सापळ्यामध्ये लावावी.  शेतकरी बंधूनी फवारणी सायंकाळी किंवा सकाळी करावी. तसेच जाडसर द्रावण थेंबा रूपाने पोग्यामध्ये पडेल अशा प्रकारे फवारणी करावी म्हणजे पोग्यात लपलेल्या अळ्याचे प्रभावी नियंत्रण करात येईल.
कीड ओळखण्याची मुख्य खुण म्हणजे, अळीच्या डोक्याच्या पुढच्या बाजूस उलट  Y आकाराची खुण असते व शरीराच्या शेवटून दुसऱ्या सेग्मेट वर चौकानी आकारात चार ठिपके दिसून येतात.
एकात्मिक व्यवस्थापन-
किडग्रस्त पिकाच्या शेताची खोल  नांगरणी शक्यतो दिवसा करावी म्हणजे  पक्षाद्वारे किडीच्या  वेगवेगळ्या अवस्था नष्ट  करण्यास मदत होईल. पिकाचे नियमित सर्वेक्षण करावे व या किडीचे पतंग  आकर्षित करण्यासाठी प्रकाश सापळे व  कामगंध सापळ्याचा वापर करावा, पिकावरील अंडीसमूह तसेच अळ्या हाताने गोळा करून नष्ट कराव्यात,  टेलेनोमस रेमस व  ट्रायकोग्रामा या परोपजीवी  कीटकांचे  एकरी  पन्नास  हजार अंडी या प्रमाणे  शेतात सोडावे, त्यानतर चार ते पाच  दिवसापर्यंत रासायनिक  किटकनाशकांची फवारणी करू नये,  अँझेडीरँकटीन १५००  पीपीएम किंवा  निंबोळी अर्क पाच टक्के  ५० मी.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे, न्युमोरीया रीलई किंवा  मेटार्हीझीयम ॲनिसोल्पी या जैविक  कीटकनाशकांची  ४० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून संध्याकाळच्या वेळी फवारणी करावी.
रासायनिक कीटकनाशकांचा वापर
या  किडीने ग्रस्त झालेली पाच टक्के  झाडे आढळून  आल्यास पुढील प्रमाणे  किटकनाशकांची  फवारणी करावी.
थायमेथोक्झाम १२.६ टक्के + ल्यँम्ब्डा सायहँलोथ्रीन ९.५ टक्के झेड सी ३ मि.ली.  किंवा क्लोरॅट्रँलीनिप्रोल  १८.  टक्के  एस सी ३ मि.ली.  प्रति  दहा  लिटर  पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अकोला मोहन वाघ यांनी कळविले आहे.
०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज