महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना शेतक-यांना प्रामाणिकरण करतांना येणा-या अडचणीबाबत सुचना


       अकोला, दि. 6 (जिमाका):  महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी जिल्हा पातळीवर सुरु आहे. योजनेअंतर्गत बॅंकाकडुन अपलोड झालेल्या कर्जखात्याच्या माहितीवर पोर्टलद्वारे संस्करण करुन पात्र लाभार्थ्यांची यादी निर्गमित होणार आहे. अशा यादीमधील समाविष्ठ  असलेल्या शेतक-यांनी नजीकच्या आपले सरकार केंद्रावर जावुन आधार प्रामाणिकरणाद्वारे त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या कर्जखात्याच्या तपशीलाबाबत सहमती / असहमती दर्शविणे आवश्यक आहे. तथापी, आधार प्रामाणिकरणावेळी त्यांच्या  बोटाचे ठसे उमटले नाहीत तर शेतक-यांची सहमती / असहमती नोंदविली जाणार नाही. तसेच योजनेसाठी तयार करण्‍यात आलेल्‍या पोर्टलवर संबंधित बॅंकांनी कर्ज खात्याची माहिती संगणकामार्फत इंटरनेटद्वारे अपलोड करणे अभिप्रेत आहे. तथापी ग्रामीण भागात वीज पूरवठा वारंवार खंडीत होणे व इंटरनेटच्या सुविधेमध्ये सातत्य नसणे यामुळे बॅंकाकडुन माहिती अपलोड करतांना अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानुसार जर शेतक-यांच्या बोटांचे ठसे उमटले नाहीत तर अश्या प्रकरणी त्यांना संबंधित तहसिलदारकडे आपले म्हणने लेखी अर्जाद्वारे देण्याची मुभा असेल. तहसीलदारांनी असे लेखी अर्ज प्राप्त झाल्यानंतर स्थानिक यंत्रणे मार्फत शेतक-यांचे लोकसांख्यीकी प्रमाणिकरण ( Demographic Authentication) करावे व तदनंतर त्याबाबतची सद्यस्थिती पोर्टलवर अपलोड करावी. 
       महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजना २०१९ करिता संबंधित विभाग प्रमुख यांनी मिशन मोड मध्ये काम करण्यात यावे व सदर योजनेद्वारे कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही याबाबत आवश्यक ती दक्षता संबंधित विभाग प्रमुखांनी घेण्यात यावी असे जिल्हा प्रशासनाद्वारे आवाहन करण्यात येत आहे.
                                                                          00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज