‘आत्मा’तर्फे शनिवारी रानभाजी महोत्सव

 ‘आत्मा’तर्फे शनिवारी रानभाजी महोत्सव

 

            अकोला, दि. 8 : कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेतर्फे (आत्मा) जिल्हा रानभाजी महोत्सव शनिवारी, दि. 12 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते दु. 3 या वेळेत येथील मूर्तिजापूर रस्त्यावरील ‘आत्मा’ कार्यालयाच्या परिसरात होणार आहे.

 

नागरिकांना रानभाज्यांची ओळख,  आरोग्यविषयक महत्व व जनजागृतीसाठी जिल्ह्यात व तालुक्याच्या ठिकाणी दि. 9 ऑगस्ट  ते 15 ऑगस्टदरम्यान रानभाजी महोत्सव घेण्यात येत आहेत.

महोत्सवात वैयक्तिक  शेतकरी, शेतकरी उत्पादन कंपनी, शेतकरी  गटांमार्फत  रानभाज्या  विक्री केली जाईल. रानभाजी विक्रीसाठी स्टॉल  आवश्यक असल्यास  शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, गटांनी आत्मा  कार्यालयास  दि. 10 ऑगस्टपूर्वी संपर्क  साधावा. जिल्ह्यातील नागरिकांनी महोत्सवाला भेट द्यावी, असे आवाहन प्रकल्प संचालक डॉ. मुरली इंगळे यांनी केले आहे.

000 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ