विभाजन विभिषिका स्मृती प्रदर्शनातून उलगडला फाळणीचा घटनाक्रम


अकोला, दि. 14 : भारतीय टपाल विभागातर्फे विभाजन विभिषिका स्मृती दिनानिमित्त येथील मुख्य टपाल कार्यालयात फाळणीचा घटनाक्रम उलगडणा-या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजिण्यात आले होते.

भारताच्या फाळणीच्या द्वेष आणि हिंसापूर्ण घटनेने लाखो भारतीय बंधू भगिनींना विस्थापित व्हावे लागले. कित्येक बांधवाना आपले प्राण देखील गमवावे लागले. त्याच्या संघर्ष आणि बलिदानाच्या स्मृतीप्रित्यर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणे आज विभाजन विभिषिका स्मृती दिन पाळला गेला. प्रदर्शनात भारताच्या फाळणीबाबतचा घटनाक्रम सचित्र माध्यमातून मांडला गेला. पूर्वजांनी दिलेल्या बलिदानाची जाणीव आजच्या पिढीला व्हावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ