अल्पसंख्याक विद्यार्थीबहुल शाळांनी अनुदानासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 अल्पसंख्याक विद्यार्थीबहुल शाळांनी अनुदानासाठी अर्ज करण्याचे आवाहन

अकोला, दि. 4 : धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थीबहुल शाळांनी पायाभूत सुविधांसाठी अनुदान मिळण्यासाठी दि. 10 ऑगस्टपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.

अल्पसंख्याक विकास विभागातर्फे शासनमान्य खासगी अनुदानित, विनाअनुदानित, कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका, नगरपरिषध व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदान दिले जाते. त्यासाठी अर्ज करण्याची मुदत 31 जुलैवरून दि. 10 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. अधिकाधिक शाळांनी अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मुदतीत प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी करून व त्रुटींची पूर्तता करून अंतिम प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येतील. 

           

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ