ग्रामसभेच्या माध्यमातून होणार क्षयरोगाबाबत जनजागृती

 अकोला, दि. 14 : .. राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमात 2025 पर्यंत ‘क्षयरोगमुक्त भारत’ करण्याचे धोरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निश्चित केले आहे. त्यानुसार क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत हा उपक्रम राबविण्यात येत असून, स्वातंत्र्यदिनी ग्रामसभेच्या माध्यमातून त्याबाबत जनजागृती करावी, असे निर्देश जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांनी दिले आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांना क्षयरोगाशी संबंधित समस्यांची व्याप्ती आणि तीव्रता ओळखण्यासाठी सक्षम करणे, त्याचे निराकरण करण्यासाठी आवश्यक कृती करणे, क्षयरोग दूर करण्यासाठी पंचायतींमध्ये स्पर्धा निर्माण करणे आणि योगदानाबाबत प्रशस्ती करणे असा उपक्रमाचा उद्देश आहे  ग्रामपंचायत क्षयरोगमुक्त असल्यास पहिल्या वर्षी कांस्यपदक, दुसऱ्या वर्षी सलग क्षयरोगमुक्त असल्यास रजतपदक आणि सलग 3 वर्षे क्षयरोगमुक्त राहिल्यास सुवर्णपदक देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मनीष शर्मा यांनी दिली.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ