कृषी पायाभूत निधी योजनेबाबत बार्शिटाकळीत बुधवारी कार्यशाळा

कृषी पायाभूत निधी योजनेबाबत बार्शिटाकळीत बुधवारी कार्यशाळा अकोला, दि. 29 : कृषी विभागातर्फे कृषी पायाभूत सुविधा योजनेबाबत कार्यशाळा बार्शिटाकळी पंचायत समितीच्या सभागृहात दि. 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 वा. आयोजिण्यात आली आहे. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या कृषी क्षेत्रातील कार्याचे स्मरण म्हणून दि. 30 ऑगस्ट रोजी त्यांची जयंती शेतकरीदिन म्हणून साजरी करण्यात येणार आहे. त्यानिमित्त कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी पायाभूत सुविधा निधीत बाजार संपर्क वाढवून निव्वळ उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी माल काढणीपश्चात सुविधा निर्माण करण्याच्या हेतूने 2 कोटी मर्यादेपर्यंतच्या सर्व बँक कर्जावर वार्षिक 3 टक्के व्याज सवलत देण्यात येते. ही सवलत जास्तीत जास्त 7 वर्षासाठी उपलब्ध असते. कृषी खाद्य उद्योग उभारू इच्छिणा-या शेतकरी बांधव, युवकांसाठी ही कार्यशाळा मार्गदर्शक ठरणार आहे. कार्यशाळेला जास्तीत जास्त शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे सदस्य, महिला बचत गटांचे सदस्य, सहकारी संस्थेचे सदस्य, भूमीहीन व्यक्ती, कृषी उद्योजक, प्रगतीशील शेतकरी, नागरी सेवा केंद्राचे चालक आदींनी उपस्थित राहण्याचे आवाहन कृषी अधिकारी संध्या करवा यांनी केले. ०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम