जिल्ह्यात पावसाची शक्यता

अकोला, दि. 17 : नागपूर येथील प्रादेशिक हवामान विभागाने अकोला जिल्ह्यात दि. 18 ते 23 ऑगस्टदरम्यान पावसाची शक्यता वर्तवली आहे. नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

 नागरिकांनी नदी, नाल्यांमध्ये पोहण्याचा प्रयत्न करू नये. पूरस्थिती पाहण्यासाठी नदीकाठावर जाऊ नये. वीज व पावसापासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. झाडाखाली आश्रय घेऊ नये. पुलावरून पाणी वाहत असल्यास तो ओलांडू नये. नदी-नाला काठावर सेल्फी काढण्याचा मोह टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

००० 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना