‘हर घर तिरंगा’ मोहिमेसाठी टपाल कार्यालयात राष्ट्रध्वज उपलब्ध


अकोला, दि. 7 : देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त दि. 13 ते 15 ऑगस्टदरम्यान ‘हर घर तिरंगा’ मोहिम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी नागरिकांना राष्ट्रध्वज उपलब्ध व्हावेत म्हणून टपाल कार्यालयाद्वारे राष्ट्रध्वजांची विक्री सुरू करण्यात आली आहे.

अकोला टपाल विभागातील सर्व पोस्ट ऑफिसमधून तिरंगा झेंडा केवळ 25 रू. किमतीत उपलब्ध करून दिला जाणार आहे. ही सेवा पोस्टमनच्या माध्यमातून घरपोच देण्याचा संकल्प डाकविभागाने केला आहे. त्यासाठी www.epostoffice.gov.in या संकेतस्थळावर ‘ई-टपाल’ सुविधेच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाची खरेदी करता येणार आहे. राष्ट्रीय एकतेची भावना वृद्धिंगत व्हावी यासाठी  हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

नागरिकांना घर, कार्यालयावरावर फडकवलेल्या राष्ट्रध्वजासह सेल्फी फोटो #indiapost४Tiranga, #HarDilTiranga, , #HarGhar Tiranga  या हॅशटॅगसह समाजमाध्यमांवर अपलोड करावेत. सर्वांनी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन प्रवर डाक अधिक्षक बी. व्ही. चव्हाण यांनी केले.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ