समाजकल्याण कार्यकर्ता व संस्थांनी पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

 समाजकल्याण कार्यकर्ता व संस्थांनी पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

अकोला, दि. २ : सामाजिक न्याय विभागातर्फे समाजकल्याण क्षेत्रात वैशिष्ट्यपुर्ण काम करणा-या व्यक्ती व संस्थांना प्रोत्साहनासाठी विविध पुरस्कार दिले जातात. त्यासाठी इच्छूकांनी दि. १४ ऑगस्टपूर्वी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन सहायक समाजकल्याण आयुक्त एम. डब्ल्यू. मून यांनी केले आहे.

 

सामाजिक न्याय विभागातर्फे उत्कृष्ट कार्य करणा-या व्यक्ती व संस्थांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, पद्यश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, शाहु, फुले,आंबेडकर पुरस्कार व डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार आदी पुरस्कारांनी गौरविले जाते. 

              यापूर्वी दोन टप्प्यात पुरस्कार वितरित करण्याचे नियोजन होते. तथापि, काही कारणांमुळे पुरस्कार वितरण सोहळा होऊ शकला नाही. त्यामुळे आता २०१९-२०, २०२०-२१, २०२१-२२ व २०२२-२३  या चार वर्षांतील पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. 

ज्यांनी २०१९-२०, २०२०-२१, २०२१-२२ या वर्षासाठी अर्ज केला असेल, त्यांना नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

              अर्जदारांनी सुधारित चारित्र्य पडताळणी पोलीस विभागाचा अहवाल (ऑगस्ट २०२३ मधील) सादर करणे क्रमप्राप्त राहील. परिपूर्ण पुरस्कार प्रस्ताव तीन प्रतींत दि. १४ ऑगस्टपर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, निमवाडी, दक्षतानगर, पोलीस वसाहतीजवळ,अकोला येथे सादर करावा. मुदतबाह्य प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत, असे आवाहन सहाय्यक आयुक्तांनी केले आहे. 

 

०००                                             

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ