रोजगार मार्गदर्शन केंद्रातर्फे गुरूवारी पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

 रोजगार मार्गदर्शन केंद्रातर्फे गुरूवारी

पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

 

अकोला, दि. 4 : जिल्हा कौशल्य विकास विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सहकार्याने पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा गुरूवारी (दि. 10 ऑगस्ट) सकाळी 10 वा. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात होणार आहे.

अकोला येथील इनोट्रो मल्टिसर्व्हिसेस, ॲबेल इलेक्ट्रो सॉफ्ट टेक्नॉलॉजी, अमरावती येथील स्वतंत्र मायक्रो फायनान्स, छत्रपती संभाजीनगर येथील नवा भारत फर्टिलायझर, धूत इलेक्ट्रिकल सर्व्हिसेस, पुणे येथील टॅलेनसेतू सर्व्हिस, पीपल ट्री वेन्चर आदी कंपन्यांतील 230 पदे मेळाव्यात भरली जातील. इच्छूकांनी शैक्षणिक कागदपत्रे, बायोडेटा, छायाचित्रे आदी कागदपत्रांसह मेळाव्यात सहभाग घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास सहायक आयुक्तांनी केले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम