जिल्ह्यात ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रम प्रभावीपणे राबवा - जिल्हाधिकारी अजित कुंभार

 

जिल्ह्यात ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रम प्रभावीपणे राबवा

-         जिल्हाधिकारी अजित कुंभार

 

अकोला, दि. 1 : जिल्ह्यात ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रम प्रभावीपणे राबवा, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज दिले.

केंद्र शासनाकडून हा उपक्रम कार्यान्वित करण्यात आला. त्याच्या पहिल्या टप्प्यात शिलाफलकम बांधकाम, पंचप्राण शपथ, वसुधा वंदन, वीरों को वंदन, ध्वजारोहण व राष्ट्रगान आदी कार्यक्रम होतील. दुस-या टप्प्यात दि. 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत ‘मिट्टी का दिया’, तसेच दि. 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ व दि. 27 ते 28 ऑगस्ट दरम्यान कलशयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. उपजिल्हाधिकारी विजय पाटील या उपक्रमांचे नोडल अधिकारी आहेत.

विविध विभागांचे सहकार्य मिळवून उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम